महाराष्ट्रातलं सरकार पाडून दाखवा, संजय राऊतांचं भाजपला चॅलेन्ज

Smiley face < 1 min

ई ग्राम : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या मुद्यावर, “हा महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश नाही,’ अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खाजगी वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देत भाजपला इशारा दिला.

राऊत म्हणाले की, कोणताही मुहूर्त काढा, आमचे सरकार पाच वर्ष चालणारच, काहींना जुगार खेळण्याचा छंद असतो, जुगार खेळत राहतात, हे मध्य प्रदेश नाही, महाराष्ट्र आहे, असे ते म्हणाले.

वाचा:  प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेची सोशल मीडियावरील 'ती' बातमी खोटी

मध्यप्रदेशनंतर आता भाजपनं राजस्थानकडे मोर्चा वळवला आहे. पण हा घोडेबाजार महाराष्ट्रात चालणार नाही. भाजपचं मिशन लोटस असेल तर आमचं मिशन लोटांगण असेल. आम्ही भाजपला लोटांगण घालायला लावू, असं संजय राऊत यांनी मत व्यक्त केलंय.

ते म्हणाले की, हे ईश्‍वराने दिलेले संकेत आहेत आणि राज्यपाल धर्म, संस्कृती, ईश्‍वर यांना मानणारे आहेत. तसेच कोणताही मुहूर्त काढा, आमचे सरकार पाच वर्ष चालणारच, काहींना जुगार खेळण्याचा छंद असतो, जुगार खेळत राहतात, हे मध्य प्रदेश नाही, महाराष्ट्र आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

वाचा:  कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाही; अभ्यासासाठी नेमलेल्या अध्यक्षांचीच कबुली

संजय राऊत म्हणाले की, राज्यपालांचा परीक्षा घेण्याचा आग्रह चुकीचा असल्याचे नियतीने दाखवून दिले. राज्यपालांनी परीक्षेच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. देशात, राज्यात गंभीर परिस्थिती आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना संकटात टाकायचे का, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App