खरबूज लागवड तंत्रज्ञान

ई ग्राम : खरबूज हे प्रत्येकाला आवडणारे फळ आहे. खरबूज या पिकाची लागवड पूर्वी फक्त नदीच्या पात्रातच होत होती. मात्र आता या पिकाची लागवड व्यापारी तत्त्वावर खूप प्रमाणात केली जाते. उन्हाळ्यात तहान भागविणेसाठी या मधुर फळांचा उपयोग केला जातो. मनाला शांती व उन्हाळ्यात शरीराला थंडावा व दुष्काळी भागात येणारे पीक म्हणूनही या पिकाला ओळखले जाते.
जमीन व हवामान : रेताड, मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमीनीचा सामू ६.५ ते ७ असावा. चोपण व पाणी धरुन ठेवणाऱ्या जमीनीत हे पीक घेऊ नये. भारी जमीनीत पिकांना नियमीत पाणी दिले नाही तर फळे तडकतात. या पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान मानवते. म्हणून या पिकाची लागवड उन्हाळ्यात करतात. वेलीच्या चांगल्या वाढीसाठी २४-२६ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त आहे.
सुधारित जाती :महात्मा पुले कृषि विद्यापीठाने पुसा सरबती, हरामधू, पंजाब सुनहरी व दुर्गापुरा मधू या जाती शिफारशीत केल्या आहेत. तसेच खासगी कंपनीच्या कुंदन, बॉबी, मृदला या जातीची लागवडही बऱ्याच प्रमाणात केली जाते. एकरी ३५०-४०० ग्रॅम बियाणे लागते.
रोपवाटिका व्यवस्थापन : यापूर्वी खरबूजाची थेट बियाणे टोकून केली जात होती. परंतू सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार प्लॅस्टिक ट्रेमध्ये (प्रो.ट्रे.) वाढविलेल्या रोपांची पुर्नलागवड केली जाते. यामुळे वेलांचे योग्य प्रमाण, मजूर, पाणी आणि इतर निविष्ठांवर होणारा खर्च वाचतो. आणि वेळेचीही बचत होते. रोपे तयार करण्यासाठी साधारणतः ९८ कप्पे असलेला प्रो ट्रे वापरतात. यामध्ये कोकोपीट भरुन बियाणे लागवड केली जाते.
खरबूजासाठी १.५ ते २ किलो बियाणे प्रति हेक्‍टरी लागते.
बियाणे लागवडीपूर्वी कॅप्टन किंवा कार्बेन्डेझिम २.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणास चोळावे व नंतर लागवड करावी व पाणी द्यावे. लागवड केल्यानंतर ८-१० ट्रे एकावर एक ठेवून काळ्या पॉलिथीन पेपरने झाकून घ्यावेत. झाकल्युाळे उबदारपणा टिकून राहतो. यामुळे बी लवकर उगवून निघते. रोपे उगवून आल्यानंतर ३-४ दिवसानंतर पेपर काढावा व ट्रे खाली उतरवून ठेवावेत. रोपे सडू नयेत म्हणून पेरणीनंतर दहाव्या दिवशी कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड किंवा हायड्रॉक्‍साईडची दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. नागअळी व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ट्रायझोफॉस व इमिइॅक्‍लोप्रीड ०.५ मिली/लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. १४ ते १६ दिवसता (पहिल्या फुटवा फुटल्यानंतर) रोपांची पुर्नलागवड करावी.खरबुजाची लागवड १.५ x १ मीटर अंतरावर किंवा १.५x०५ मीटर अंतरावर करावी.
लागवडीचा हंगाम उन्हाळा – जानेवारी ते मार्च, पावसाळा – जून ते ऑक्‍टोबर.
लागवडीसाठी ठिबक सिंचन पद्धत साधारणतः सात फुटावर लॅटरल असावी. इनलाईन ड्रिपर १.५ फुटावर असावा. या पद्धतीमध्ये चोकअप होण्याचा त्रास नसतो. ठिबक सिंचनासाठी ३० सेमी च्या अंतरावर इमीटर (ठिबक) असलेल्या इनलाईन लॅट्ररल्स (दोन लिटर प्रति तास क्षमतेच्या) वापराव्यात. फळधारणेनंतर एक सारख्या प्रमाणात पाणी द्यावे.
सिल्व्हर मल्चिंग पेपरचा वापर . गादीवाफ्यावर ठिबक अंथरल्यावर खरबूज लागवडीपूर्वी १.२५ मीटर रुंद आणि ४०० मीटर लांब प्रती रोल (पेपरची जाडी ३० मायक्रॉन) मल्चिंग पेपर अंथरावा. यामुळे जमीनीचे तापमान, आर्द्रता अनुकूल राहून पांढऱ्या मुळांची वाढ उत्तम होते. पाण्याची बचत, तण नियंत्रण, खतांची बचत तसेच काहीशा प्रमाणात किडींचे नियंत्रण होते. एकरी पेपरचे ४-५ रोल लागतात.
लागवडीचे तंत्र : लागवडीसाठी ७५ सेमी. रुंद आणि १५ सेमी उंच गादी वाफे तयार करावेत.
लागवडीपूर्वी ५०ः५०ः५० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्‍टरी व लागवडीनंतर एक महिन्याने ५० किलो नत्र प्रति हेक्‍टर मात्रा द्यावी. बेसल डोसमध्ये एकरी ५ टन शेणखत + ५० किलो डीएपी +५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश + ५० किलो १०ः२६ः२६ + २०० किलो निंबोळी पेंड + १० किलो झिंक सल्फेट मिसळावे.
दोन गादी वाफ्याच्या मधोमध लॅटरल येते. याचे अंतर ७ फुट असावे.
वाफ्याच्या वरचा माथा ७५ सेमी असावा. वाफ्याच्या मधोमध लॅटरल टाकून यावर ४ फुट रुंदीचा मल्चिंग पेपर अथंरुन दोन्ही बाजूंनी पेपरवर माती झाकावी. जेणेकरुन पेपर वाऱ्यामुळे फाटणार नाही.
मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर दोन इंची पाईपच्या तुकड्याच्या सहाय्याने ड्रिपरच्या दोन्ही बाजूंना १० सेमी अंतरावर छिद्रे पाडावीत.
ड्रीप लाईनच्या एकाच बाजूच्या दोन छिद्रामधील अंतर १.५ फुट ठेवावे.
छिद्रे पाडून झाल्यावर गादीवाफा ओलवून वाफसा आल्यानंतर लागवड करावी.
रोपे लावताना रोप व्यवस्थित दाबून, पेपरला चिकटणार नाही याची काळजी घेऊन लावावे. जेणेकरुन रोपांची मर होणार नाही. अशा पद्धतीत एकरी सुमारे ७२५० रोपे लागतात.
लागवडीपूर्वी ५०ः५०ः५० किलो नत्रःस्फुरदःपालाश प्रति हेक्‍टरी द्यावे व लागवडीनंतर एक महिन्याने ५० किलो प्रति हेक्‍टर नत्र खताची मात्रा द्यावी. माती परीक्षण अहवालानुसार खत नियोजन करावे. ठिबक मार्फत प्रति एकर एका दिवसाआढ खत देण्याचे प्रमाण व खताची मात्रा (एकरी) ठिबक सिंचनातून द्यावयाची विद्राव्य खत मात्रा

Read Previous

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी जिल्हा परिषदेकडून निधी मिळणार

Read Next

राज्यात उन्हाचा चटका कायम