लाखो वारकऱ्यांच्या सहभागाने साजरा होणारा ‘आषाढी वारी सोहळा’ यंदा १० लोकांमध्येच होणार?

Smiley face < 1 min

पुणे : ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या दर्शनाची आस लागलेल्या लाखो वारकऱ्यांचा आषाढी वारी सोहळा यंदा निवडक १० लोकांच्या उपस्थितीत संपन्न करावा. तसेच माऊलींच्या पादुका ह्या रथामधून घेऊन न जाता ट्रक सजवून त्यात पालखी आणि पादुका ठेऊन आळंदी येथून थेट पंढरपूरकडे प्रस्थान करून घेऊन जाव्यात, अशा सूचना काही दिंडी प्रमुखांनी दिल्या आहेत.

दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न होतो. पण यंदा देशात आणि राज्यात कोरोनाचे सावट असल्यामुळे यंदा हा सोहळा होणार की नाही याकडे अनेक वारकऱ्यांचे आणि दिंडी चालकांचे लक्ष लागले आहे. सालाबादप्रमाणे चालणाऱ्या या सोहळ्यात खंड पडू नये म्हणून यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने दिंडीच्या मानकऱ्यांना पत्र पाठवून सूचना करण्याचे आवाहन केले होते.

वाचा:  पाऊस सुरूच! कोकणातील पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

दरवर्षी होणार या सोहळ्यात राज्यातुन आणि राज्याबाहेरून अनेक लोक एकत्र येतात. घरापासून दूर २१ दिवस अनोळखी लोकांसोबत राहणे आणि कोणाचेचवनाव न घेता मुखात फक्त माऊली नावाचे नाम. असा हा आनंदी सोहळ्याचा यंदाच्या वर्षी हिरमोड होतो की काय? यंदा पायीवारी सोहळा होणार का ? असे अनेक प्रश्न वयस्कर वारकऱ्यांना पडत आहेत

सोहळा यांनी करावा संपन्न : सोहळा मालक आरफळकर १ व्यक्ती, एक वारकरी, एक वीणेकरी, एक चोपदार, माउलींचे दोन पुजारी, संस्थान समितीचे दोन विश्वस्त, एक मानकरी आणि एक सेवक अशा फक्त दहा लोकांचा समावेश असावा. ३० जून २०२० रोजी आळंदी येथून प्रस्थान करून दशमीला माउलींचा पंढरपूरमध्ये प्रवेश व्हावा, अशी सूचना आहे.

वाचा:  पेठ, त्र्यंबकेश्वरला पावसाचे थैमान; धरणसाठ्यात वाढ, भात शेतीला मोठा फटका

दरम्यान, याबाबत श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी देवस्थान समित्यांनी अंतिम निर्णय अद्याप तरी घेतलेला नाही. या दोन्ही संस्थानांकडून एकत्रितपणे निर्णय घेतला जाईल, असे श्रीक्षेत्र देहूचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे आणि प्रमुख चोपदार राजाभाऊ चोपदार यांनी सांगितले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App