पुणे – ढगाळ वातावरण निवळल्याने राज्यात पुन्हा कोरडे वातावरण झाले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत असलेली थंडी अजूनही कायम आहे. येत्या चार ते पाच दिवस ही थंडी राहणार आहे. मंगळवारी (ता.२) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे नीचांकी ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
काही दिवसांपासून अरबी समुद्राच्या आग्नेय भाग आणि लक्षद्वीप परिसरात चक्रीय स्थिती तयार होण्यासाठी पोषक वातावरण आहे. तसेच अरबी समुद्राच्या आग्नेय भाग आणि परिसर, लक्षद्वीप परिसर ते उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टीपर्यंत, अरबी समुद्राचा पूर्व भाग या दरम्यान चक्रीय वाऱ्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. येत्या दोन ते तीन दिवस ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात थंडीत काही ठिकाणी चढउतार होतील.
उत्तर भारतातील काही राज्यांत येत्या दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. त्यामुळे थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. त्यातच राज्यात असलेले कोरडे हवामानामुळे काही प्रमाणात थंडी वाढल्याने किमान तापमानाचा पारा सात अंश सेल्सिअसपर्यंत खाला होता.
दरम्यान, सध्या राज्यात ९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. कोकणात थंडी कमी झाल्याने किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे किमान तापमान १८ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य किंचित थंडी आहे. त्यामुळे किमान तापमान ९ ते २० अंश सेल्सिअस, मराठवाड्यात ११ ते १५ तर विदर्भात ९ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.