लम्पी स्कीनच्या साथीकडे पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष;शेतकरी चिंतेत

Smiley face < 1 min

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील मांडकुली (ता.कुडाळ) गावातील २० हून अधिक गुरांना लम्पी स्कीन साथीची लागण सुरू झाली आहे. सध्या या गुरांना ताप, अंगावर पुरळ येणे, पायांना सूज येणे, अशी लक्षणे दिसत आहेत. या साथीकडे पशुसंवर्धन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे मांडकुलीचे सरपंच तुषार सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मांडकुली गावातील शेतकरी सध्या गुरांना आलेल्या साथीमुळे हैराण झाले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून गुरांना ताप येणे, अंगावर पुरळ येणे, पायांना सूज येणे, अशा लक्षणांनी गुरे त्रस्त आहेत. ही सर्व लक्षणे लम्पी स्कीन साथीची असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वाचा:  माणुसकीला काळीमा! पोटच्या मुलाकडून आई-वडीलांना जबर मारहाण; आईचा मृत्यू, वडील कोमात

गेल्या पाच-सहा दिवसांत वीसहून अधिक गुरांना लागण झाली आहे. या साथीकडे पशुसंवर्धन विभागाने काणाडोळा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी पशू दवाखान्यात गुरांचे उपचार करून घ्यावे लागत आहेत. उपचाराकरिता प्रत्येक गुरांसाठी ६०० ते ८०० रुपये खर्च येत आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना खासगी उपचार करून घ्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात सरपंच तुषार सामंत यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा:  चर्चेसाठी मुंबईला मी एकटा जाणार नाही; संभाजीराजेंची भूमिका

दरम्यान, गुरांना लागण झाल्यानंतर देखील पशुसंवर्धन विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. या साथीविषयी पशुसंवर्धन विभागाला कल्पना दिली होती. परंतु त्यांनी कर्मचारी वर्ग नसल्याचे कारण पुढे केल्याचे सामंत यांनी सांगितले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App