थंडीचा प्रभाव काहीसा कमी; जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज

Smiley face < 1 min

पुणे : उत्तर महाराष्ट्र ते लक्षद्वीप या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे. येत्या काही दिवस थंडी कमीअधिक स्वरूपाची राहील. सोमवारी (ता.२२) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १३.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

वाचा:  महावितरणच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर

उत्तर भारतासह राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. मागील काही दिवस ढगाळ हवामानासह अनेक ठिकाणी अवकाळीसह काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. त्यानंतर पावसाने उघडीप देत अचानक हवेत गारवा पसरल्याने किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. त्यानंतर पुन्हा हवेतील गारवा कमी झाल्याने किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे.

विदर्भ वगळता उर्वरित सर्वच भागात थंडी कमीअधिक असल्याने किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. सध्या राज्यात आकाश निरभ्र असले तरी काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. यामुळे काही प्रमाणात थंडी पुन्हा कमी झाली आहे.

वाचा:  पोलीस प्रशासनाच्या वेळेत बदल; काहींना वर्क फ्रॉर्म होम, तर काहींची कार्यालयात उपस्थिती

कोकण व मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. कोकणात किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस, तर मध्य महाराष्ट्रात १३ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातही काही भागात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. या भागात किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

वाचा:  ‘लोणार विकासाचा कृतिआराखडा सादर करा’

दरम्यान, विदर्भातही अजूनही बऱ्यापैकी थंडी कायम आहे. गोंदिया येथे १३.८ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागात १४ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App