अमूल’चे पुढचे पाऊल! कृत्रिम रेतन प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञान वापरणारी देशातील पहिली सहकारी संस्था

Smiley face < 1 min

अहमदाबाद – कृत्रिम रेतनाच्या प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणारी अमूल डेअरी ही देशातील पहिली सहकारी संस्था ठरली आहे. देशातील डेअरी उद्योगाच्या दृष्टिने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. डेअरी उद्योगात मोठ्या प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यास गुजरातमधील अमूल डेअरीकडून सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने डेअरी उद्योगात अमुलाग्र बदलांची संधी उपलब्ध झाली आहे.

अमूलने कृत्रिम रेतनामध्येही डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरवात केली आहे. अमूलने सुरवातीला हा प्रयोग खेडा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या अंतर्गत येत असलेल्या १ हजार २०० दूध उत्पादक संघांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविला होता. एक वर्षभर या प्रयोगाची अंमलबजावणी केल्यानंतर त्याचे चांगले निष्कर्ष दिसून आले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय अमूलने घेतला आहे.

वाचा:  कापूस महामंडळाने महाराष्ट्रातून केली २६ लाख गाठींची खरेदी

मोबाईलवर मिळणार अलर्ट –

गाईंच्या कृत्रिम रेतनासंदर्भातील अलर्ट दूध उत्पादकांना आणि दूध उत्पादक सहकारी संस्थांना तातडीने आणि योग्य वेळी त्यांच्या मोबाईल फोनवर पोहचविण्याची सुविधा नव्या तंत्रामुळे शक्य झाली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गाईंच्या मालकांनी अमूलच्या या संदर्भातील कॉल सेंटरकडे नोंदणी करणे अपेक्षित आहे.

आपल्या कार्यक्षेत्रात अमूलकडून दर वर्षी दहा लाखांहून अधिक जनावरांचे कृत्रिम रेतन केले जाते, अशी माहिती गुजरातमधील आनंद येथील अमूल डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक अमीत व्यास यांनी दिली. कृत्रिम रेतनाच्या प्रक्रियेत डिजिटल तंत्राचा वापर करण्यात आल्यामुळे माहितीतील पारदर्शकता आणता येते आणि तिचे विश्लेषण करणे सूलभ होते. त्यामुळे अचूकपणे निर्णय घेता येतात. जेणे करून दूग्ध व्यावसायाला चालना मिळू शकते, असेही व्यास यांनी नमूद केले.

वाचा:  सावधान! राज्यात ढगफुटींच्या घटनांमध्ये होणार वाढ; महाराष्ट्र बनतोय ढगफुटींचा प्रदेश

अमित व्यास म्हणाले की, अमूलच्या कार्यक्षेत्रातील गाव पातळीवरील सर्व दूध उत्पादक संस्थांनी या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद दिला. डिजिटल तंत्र वापरून केल्या जाणाऱ्या कृत्रिम रेतनासाठी नोंदणी करणारे साडे चार हजार कॉल दररोज अमूलच्या कॉल सेंटरकडे येतात.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App