प्रक्रिया उद्योगातच शेतीला भविष्य – उद्योग मंत्री

Smiley face < 1 min

ई ग्राम : भाजीपाला, तसेच फळ पिकांचे 30 टक्के नुकसान हे योग्य काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाच्या सुविधेअभावी होते. त्यामुळे दरवर्षी देशाचे करोडोंचे नुकसान होते. प्रत्येक गावात, तालुक्‍यात आणि जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास हे नुकसान कमी होऊन शेतमालाला चांगला भाव मिळेल. प्रक्रिया उद्योगातच शेतीला भविष्य आहे. प्रक्रिया उद्योगासाठी तरुणांना ग्रामीण भागात मोठी संधी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योग, खाणकाम व मराठी भाषेचे कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

वाचा:  कोरोना संपल्यावर मनमानी करा, खासदार बापटांचा अजित पवारांना टोला

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात स्मार्ट अन्न प्रक्रियाचे प्रगत तंत्रज्ञान या विषयावरील दोन आठवड्यांच्या ऑनलाइन प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, डॉ. नारायणसिंग ठाकोर, डॉ. दिलीप पवार, डॉ. मुकुंद शिंदे, प्रशिक्षणाचे सचिव डॉ. विक्रम कड उपस्थित होते.

वाचा:  किसान क्रेडिट कार्डवर दिले जाणारे 3 लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी द्या; कृषी मंत्री दादा भुसे यांची केंद्राकडे मागणी

देसाई पुढे म्हणाले, की महाराष्ट्र सरकारने राज्यात आठ मेगा फूड पार्क, तसेच 600 पेक्षा जास्त मार्केट पार्क सुरू केले आहेत. महाराष्ट्रात शेतमालाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या सोयी-सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. यामध्ये कृषी क्षेत्रातील नवीन उद्योजकांना शेतमाल प्रक्रिया उद्योगांमध्ये खूप मोठा वाव आहे.

कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा म्हणाले, की विद्यापीठाने आतापर्यंत विविध फळांच्या, तसेच भाजीपाला पिकांच्या विविध जाती संशोधित करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यामध्ये बहुमूल्य कामगिरी केली आहे. शेतमालाचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाले, तरच सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल.

वाचा:  शिवसेना नसती तर भाजपचा 105 ऐवजी 40-50 आमदारांचा आकडा असता – शरद पवार

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App