शासनाने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा

Smiley face < 1 min

ई ग्राम : राज्यातील धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक असतानाही शेतीला पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने सिंचन व्यवस्थेमध्ये बदल करायला पाहिजे. असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य राजन क्षीरसागर यांनी व्यक्त केले. क्षीरसागर यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी धरणातील आजचा पाणीसाठा आणि लांबलेला मान्सून या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि राज्यात सर्वाधिक धरणांची संख्या आहे, राज्यातील धरणांमध्ये सध्या ३७ टक्के पाणी शिल्लक आहे. लॉकडाऊन मुळे औद्योगिक शहरे बंद असल्यामुळे पाणीउपसा कमी झाला. दुसरीकडे सिंचनाच्या लाभ क्षेत्रात कालव्यांची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे हे चित्र निर्माण झाले आहे का ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर धरणातील शिल्लक पाणी शासनाच्या ढिसाळ नियोजनांचा परिणाम आहे. असे क्षीरसागर यावेळी म्हणाले.

२९ मे
दत्ता काकडे
प्रदेशाध्यक्ष, सरपंच परिषद, महाराष्ट्र (मुंबई)
विषय : लाॅकडाऊनच्या काळातील ग्रामपंचायत पातळीवर उपाययोजना

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App