राज्यात पावसाचा जोर कमी होणार; पण…

Smiley face < 1 min

पुणे – दक्षिण गुजरातची किनारपट्टी आणि तेलंगणापर्यंत चक्रवाताची स्थिती असून ती मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या दरम्यान आहे. यामुळे कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र, रविवार (२० सप्टें.) नंतर या भागातील पावसाचा जोर काहीसा कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

अरबी समुद्राचा ईशान्य भाग आणि दक्षिण गुजरातची किनारपट्टी या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती पाकिस्तानच्या दक्षिण भागापर्यंत असून समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच उत्तर प्रदेशचा आग्नेय भाग, राजस्थानच्या ईशान्य भाग आणि परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. बंगालच्या उपसागराच्या पश्चिमेमध्ये आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्यांचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही अंशी ढगाळ हवामानाची स्थिती राहणार आहे.

वाचा:  पणन महामंडळाची 'ही' नवी योजना; शेतमाल वाहतूकीसाठी मिळणार अनुदान

दक्षिण गुजरातची किनारपट्टी ते उत्तर कर्नाटकाच्या किनारपट्टी दरम्यान कमी दाब क्षेत्राचा प्रभाव आहे. तसेच पूर्व विदर्भातही चक्रवाताची स्थिती कायम आहे. उत्तर भारतात असलेला मान्सूनचा पट्टा बिकानेर, गुना, नागपूर, जगदलपूर आणि दक्षिण – आग्नेय ते बंगालच्या उपसागराच्या पश्चिमेमध्ये भाग आणि उत्तर
आंध्र प्रदेशच्या परिसरापर्यंत आहे. तसेच गुजरातच्या दक्षिण परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी बुधवारी (१६ सप्टें.) पावसाच्या मेघगर्नजेसह सरी पडतील. गुरूवारपासून (१७ सप्टें.) विदर्भात अनेक ठिकाणी उघडीप राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील काही भागात दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वाचा:  अखेर पीकविम्याचा प्रश्न सुटला; आज जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App