बियाणे दरवाढीमुळे कोलमडले शेतकऱ्यांचे गणित; पाहा नवीन दर

Smiley face < 1 min

नागपूर : गेल्या वर्षी ७५ ते ८२ रुपये किलोने मिळणारे सोयाबीनचे बियाणे यंदा चक्क ११५ रुपये किलोने मिळत आहे. पेरणीच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांमध्ये मोठी भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. दुसरीकडे सोयाबीन बाजारात आल्यानंतर दराची शाश्‍वती नसल्याने शेतकरी विवंचनेत आहेत.

विदर्भात शेतकऱ्यांच्या हक्काचे नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाला मान्यता मिळाली. शेतकऱ्यांनी विविध उपाय करून भरपूर उत्पादनही घेतले. मात्र, उत्पादनाच्या तुलनेत या पिकाला भाव मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांत हे पीक शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, अशी अवस्था पिकाची झाली. सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. सोयाबीनचे बियाणे ११५ रुपये किलोप्रमाणे बाजारात मिळत आहे. अनेक कंपन्यांचे बियाणे बाजारात विक्रीला आहे. त्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठी भाववाढ केली.

egram
वाचा:  ‘राकेश टिकैत दहशतवादी, कृषी कायदे मागे...’; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

मागील हंगामात ७२ ते ८२ रुपये किलोप्रमाणे बियाण्यांची विक्री झाली. ३० किलोची बॅग २ हजार ४६० रुपयांना मिळायची, ती आता ३ हजार ४५० रुपयांना मिळत आहे. जवळपास ३५ रुपये एका किलोमागे वाढले आहेत. त्यामुळे सोयाबीनचे पीक घ्यायचे किंवा नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी आहेत. महत्त्वाचे म्हणजे क्विटंलवर ३ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे.

वाचा:  देशात सोयापेंडीचे पुरेसे उत्पादन असल्याने आयातीची गरज नाही : सोपा

१६ लाख ५० क्विंटल बियाण्यांची गरज
राज्यात सर्व प्रकारच्या १६ लाख ५० हजार क्विटंल बियाण्यांची गरज असते. त्यात १५ टक्क्यांवर बियाणे हे सोयाबीनचे असते. कपाशीनंतर सर्वाधिक पसंती या पिकाला आहे. शेतकरी हे नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे बघतात हे विशेष.

वाचा:  वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली?; ऊर्जामंत्र्यांचा सवाल

गतवर्षी उतारा फक्त चार क्विटंलवर
गेल्या वर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनचे हेक्टरी फक्त तीन ते चार क्विटंल उत्पादन झाले. शेतकऱ्यांसाठी हा मोठा फटका होता. शासकीय अंदाजानुसार सोयाबीन पिकाचे उत्पादन २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टरी व्हायला पाहिजे. नागपूर जिल्ह्यात गेल्यावर्षी ३.८१ क्विंटल हेक्टरी उत्पादन झाल्याचे जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी सांगितले.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App