ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलली

ई ग्राम : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. जपानचे प्रधानमंत्री शिंजो आंबे आणि ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी संयुक्तपणे वार्ताहर परिषदेत आज हे जाहीर केलं.

संपूर्ण जग आज कोविड-१९ चा सामना करत आहे आणि हे संकट कमी होण्याची चिन्ह फार कमी आहेत, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं  त्यांनी सांगितलं. 

जपानसाठी ही एक दुःखद घटना आहे. कारण जपानने या स्पर्धेची तयारी पूर्ण केली आहे. पण या संकटामुळे हा निर्णय घेणं अनिवार्य होतं, असं प्रधानमंत्री शिंजो आंबे यांनी सांगितलं.

Read Previous

भारताकडे ‘कोरोना’चे उच्चाटन करण्याची उत्तम क्षमता – WHO

Read Next

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर लवकरच आर्थिक प्रोत्साहन पॅकेज