पोलीस कर्मचार्‍यालाच पोलिसांची बेदम मारहाण

ई ग्राम : देशाचे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी देशभरात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. राज्यातही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व जिल्हे सील केले असून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आता पोलिस प्रशासनावर आहे. स्वत: चा जीव धोक्यात घालून पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. मात्र राज्यातील काही भागांत पोलिसांकडून विनाकारण बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप होतो आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कन्हेरगाव नाका येथील एका पोलिस कर्माचार्‍यालाच पोलिसांकडून बेदम मारहाण झाली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साहेबराव राठोड असे सदर पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. मुलीला घेऊन मेडिकल मधून औषध आणायला राठोड गेले असताना त्यांमा मारहाण झाल्याचे समजत आहे. काहीही विचारपूस न करता मारहाण झाल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे. याप्रकरणामुळे पोलिसांकडून सामान्य नागरिकांना विनाकारन मारहान केली जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी अत्यावश्यक गोष्टींकरता बाहेर पडणार्‍या नागरिकांवर पोलिसांनी बळाचा वापर करु नये असे सांगितले आहे. दवाखाना, अन्न-धान्य याकरता नागरिक बाहेर पडू शकतात असे शासनाने सांगितले आहे. मात्र तरिही राज्यात पोलिसांकडून अनावश्यक बळाचा वापर होत असल्याच्या घटना घडत आहेत.

माझ्या मुलीला जनावरासारखा मारलं – वडील साहेबराव राठोड ( पोलीस जमादार)
मी गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत कनेरगाव नाका येथे जिल्हा सीमा बंदीचा बंदोबस्त करू हिंगोली येथे शुगर च्या गोळ्या घेण्यासाठी आलो होतो. आरोग्य सेवेत असलेल्या माझ्या मुलींने मला फोन केल्यामुळे तिला घेऊन घरी जाताना असतांना नांदेड नाका येथे आमचे म्हणणे ऐकून घेण्यापूर्वी पुंडगे मॅडम यांनी माझ्यामुलीला बेदम मारहाण केली जनावराला एवढे मारत नाहीत. परत त्यांनीच माझ्या मुलीचा अपघात झाला म्हणून आरोग्य अधिकाऱ्याला माहिती दिली आहे.

माझ्या सह अन्य पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर वर होते. त्या दोघांना विचारपूस करण्यासाठी गेला असता संबंधित महिला चक्कर आल्याने खाली पडली त्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला त्यानंतर आम्ही तिला घेऊन हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. संबंधित आरोग्य कर्मचारी महिलेला कोणतीही मारहाण केली नाही.

सपोनि पुंडगे
Read Previous

आरोग्य सहाय्यीकेला पोलिसांकडून बेदम मारहाण

Read Next

शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये तर गरिबांना मोफत गॅस – अर्थमंत्री