नांदेड – तूर उत्पादक पट्यात नव्या तुरीची आवक सुरू झाली आहे. यंदा उत्पादनात १० ते ३० टक्क्यांपर्यंत घटीचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे बाजारात दर्जेदार तुरीला चांगले दर मिळत आहेत. लातूर बाजार समितीत कमाल ६ हजार २२५ रुपये, तर अकोला बाजार समितीत ६ हजार १५० रुपये दर मिळाला. नांदेड आणि जळगावध्ये ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपयाने तूर विकली गेली. पुढील काळात तूरदरात आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
राज्यात तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात घट येईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. यानुसार सध्या नव्या तुरीची आवक सुरू झाली आहे. आवक सर्वसाधारण असली तरी दरात मात्र तेजी आहे. नव्या तुरीला मुहूर्तावर दर साडेपाच हजारांवर पोचले.
मागील तीन-चार दिवसांत अकोला, नांदेड, लातूर, जालना, अकोला, जळगाव बाजार समित्यांमध्ये आवक वाढली आहे. लातूर बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.१९) तुरीची पाच हजार २० क्विंटलची आवक होती. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार ७२६ क्विंटल तुरीची आवक होती.
दरम्यान, जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५७६ क्विंटल तुरीची आवक होती. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची १८ क्विंटल आवक झाली होती.
“बाजारात नव्या तुरीची आवक सुरू झाली आहे. सध्या आवक सर्वसाधारण असली तरी मर रोगामुळे उत्पादनात वीस ते तीस टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित असल्याने दरात तेजी आहे. आगामी काळात तुरीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.”
चंद्रकांत शिंदे, तूर खरेदीदार नांदेड
बाजार समित्यांतील दर (रुपये/क्विंटल)
शहर – किमान/कमाल
लातूर- ५७२५/६२२५
अकोला- ४५००/६१५०
जालना- ५३००/५९५०
जळगाव- ५२००/५६५०
नांदेड- ५७००/५८५०
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.