युरिया टंचाईचा प्रश्न सुटणार ; खासदार प्रफुल्ल पटेल यांची खत उत्पादकांशी चर्चा

Smiley face < 1 min

ई ग्राम : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात खरीप धान रोवणी करणाऱ्या शेतकऱ्यांना युरियाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. हा प्रकार गांभीर्याने घेत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केंद्र सरकार व खत निर्मिती कंपन्यांशी चर्चा केली. त्यानंतर येत्या दोन दिवसांत खत कोंडी फुटत दोन्ही जिल्ह्यात युरियाचा पुरवठा केला जाणार आहे.

पावसामुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात धान रोवणीला गती आली आहे. त्यातच लॉकडाउनमुळे पुरवठ्यात अडचण आल्याने भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांत युरियाचा तुटवडा निर्माण झाला. या संधीचे सोने करीत काही व्यावसायिकांकडून जादा दराने युरिया विक्रीचा प्रकार दोन्ही जिल्ह्यांत घडत आहे.

वाचा:  कोरोनामुळे हरभऱ्याचे दर दबावात

शेतकऱ्यांच्या या संदर्भात तक्रारी वाढल्यानंतर त्याची दखल घेत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केंद्र सरकार व दिल्लीस्थित खत उत्पादक कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन्ही जिल्ह्यात युरियाचा त्वरित पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचीच दखल घेत मंगळवार (ता.१४) पर्यंत दोन्ही जिल्ह्यांत युरियाचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांनी युरियाच्या टंचाईचा मुद्दा मांडला होता. त्याची दखल घेत केंद्र सरकार व खत उत्पादक कंपन्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करण्यात आली. त्यामुळे युरियाचा पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रफुल्ल पटेल, खासदार

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App