मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरूच; उत्तर भारतातून परतले वारे

Smiley face < 1 min

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. राजस्थानातून परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर तीनच दिवसांत मॉन्सूनने संपूर्ण उत्तर भारतातून माघार घेतली आहे. शनिवारी (ता. ९) संपूर्ण राजस्थान, उत्तर प्रदेशसह गुजरात, मध्य प्रदेशचा काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

बुधवारी (ता.६) पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागातून मॉन्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर दोन दिवसात शुक्रवारी (ता. ८) वायव्य भारतातून मॉन्सून परतला. शनिवारी (ता. ९) मॉन्सूनने उत्तर भारतातून निरोप घेतला असून, परतीची सीमा मोतीहारी, गया, आंबिकापूर, मांडला, इंदोर, गांधीनगर, राजकोट, पोरबंदरपर्यंत होती.

egram
वाचा:  राज्याच्या ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ऑरेंज-यलो अलर्ट

मॉन्सूनचा परताचा प्रवास वेगाने सुरू असून, देशाच्या आणखी काही भागातून वारे परतण्यासाठी पोषक हवामान आहे. मंगळवारपर्यंत (ता. १२) गुजरात, छत्तासगडचा आणखी काही भाग, मध्य प्रदेश झारखंड, बिहारचा बहुतांशी भाग, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App