मुलगा डोक्यावर, पोट हातावर, कुंटुंब रस्त्यावर…

दिल्ली । सध्या कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. जगातील १९५ देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. या देशातील अनेक शहरातील रस्ते सुनसान पडले आहेत. जागोजागी संचारबंदी लागू केली आहे. यामुळे नागरिकांना विविध समस्येंना तोंड द्यावे लागत आहे. भारतातील अनेकांची परिस्थिती यापेक्षा जास्त गंभीर आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला आहे. पण यामध्ये हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे मात्र हाल होत आहेत. रोजगाराच्या शोधात परराज्यात गेलेल्या या स्थलांतरित मजूरांची पावले आता आपल्या गावाकडे वळली आहेत. अनेकांना रस्त्यावरच दिवस काढावे लागत आहेत. तर काहींवर उपासमारीची वेळ आली आहे.

अशाच मजुरांपैकी एक असलेला बंटी संपूर्ण कुटुंबाला घेऊन दिल्लीहून उत्तर प्रदेशात आपल्या गावी जाण्यासाठी निघाला आहे. लॉकडाउनमुळे कुठलेही वाहन उपलब्ध नसल्याने हे संपूर्ण कुटुंब पायीच दिल्ली ते उत्तर प्रदेश प्रवास करणार आहे. जागोजागी पोलिस बंदोबस्त आणि सार्वजानिक वाहतूक सेवा ठप्प यामुळे बंटीला पायी जाण्यावाचून पर्याय उरला नाही. हातावर पोट असलेला ह्या बंटीने आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन मूळगावी जाण्यासाठी पायीच निघाला आहे.

दिल्ली मध्ये हातावर पोट असणाऱ्या बंटीवर आता कोरोनाच्या लॉकडाउन मुळे उपासमारीची वेळ आली आहे. ‘आम्ही इथे काय खाणार? दगड, माती तर खाऊ शकत नाही’अशी प्रतिक्रिया कुटुंबातील महिलेने दिली. तिच्या डोक्यावर एक निळी बॅग होती. त्यामध्ये त्यामध्ये कुटुंबाचे सर्व साहित्य होते. बंटीचे त्याच्या मुलाला खांद्यावर बसवले होते. “दिल्लीत काही नाही, इथे कोणी मदत करणार नसल्यामुळे आम्ही गावी निघालो आहोत” असे या कुटुंबाने सांगितले.

Read Previous

ग्रामपंचायत सरपंचांनी मानले गावातील युवकांचे आभार

Read Next

कोरोनाग्रस्तांसाठी मोदी सरकारची दीड लाख कोटींची तरतूद, वास्तव की अफवा ?