राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला सादर होणार

Smiley face < 1 min

ई ग्राम। महाराष्ट्र विधिमंडाळाचं अर्थसंकल्पी अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होणार आहे. तसेच अर्थसंकल्प सहा मार्च रोजी विधानसभेत सादर केला जाणार आहे. अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली. संसदेच्या अर्थसंकल्पानंतर आता राज्याच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महाविकास आघाडी सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे उत्सुकता आहे.

या पार्श्वभूमीवर विधानभवनात विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या अर्थसंकल्पाचा कालावधी चार आठवड्याचा असणार आहे. त्यातील १८ दिवस विधिमंडळात कामकाज चालणार आहे. त्यातच सहा मार्च (सोमवार) रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.

वाचा:  या देशात वाढले सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र !

यंदाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात २४ फेब्रुवारी रोजी पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. त्याचबरोबर २०१४-२०१५, २०१५-२०१६ आणि २०१६-२०१७ या वर्षांच्या अतिरिक्त खर्चाच्या मागण्या दसरा केल्या जाणार आहेत. या अधिवेशनात शासकीय विधेयके मांडून विचारात घेण्याचे प्रस्तावित आहेत. तसेच पाच अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे प्रस्तावित आहेत.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App