राज्य सरकारकडून अखेर फळपिक विमा योजना जाहीर

Smiley face < 1 min

ई ग्राम : राज्यात हवामानावर आधारित पुनर्रचित फळपिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. मृगात सहा फळपिकांसाठी १८ जिल्ह्यात तर अंबिया बहारासाठी आठ पिकांकरीता २३ जिल्हयांचा समावेश करण्यात आला आहे. मृग बहारात संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु लिंबूकरीता तसेच आंबिया बहारात संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष व प्रायोगिक तत्त्वावर स्ट्राॅबेरीसाठी विमा उपलब्ध राहील.  

यापूर्वी काही भागात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोगस सातबारा देणे किंवा सातबारावर नाव नसणे, पीक नोंदणी चुकीची असणे याचा शोध घेतला जाणार आहे. जिल्हा संनियंत्रण समितीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संबंधित विमा कंपनी अशा शेतकऱ्यांवर फौजदारी कारवाई करु शकेल, असे कृषी विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

अशी आहे अर्जाची मुदत
शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत अशी आहे. मृग बहाराच्या मोसंबी व चिकू पिकासाठी ३० जून, संत्रा पिकासाठी २० जून (मृग २०२० साठी), पेरु पिकासाठी १४ जून (मृग २०२१ व २०२२) डाळिंब पिकासाठी १४ जुलै. आंबिया बहारमधील द्राक्ष पिकासाठी १५ ऑक्टोबर, मोसंबी व केळीसाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा, काजू आणि कोकणातील आंबा पिकासाठी ३० नोव्हेंबर, इतर जिल्ह्यातील आंबा पिकासाठी आणि डाळींबासाठी ३१ डिसेंबर, स्ट्रॉबेरीसाठी १४ ऑक्टोबर आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App