राज्यात पुढील दोन दिवस थंडी राहणार; हवामानात मोठा बदल

Smiley face < 1 min

पुणे – उत्तरेकडील मध्य प्रदेशच्या राज्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे राज्याच्या काही भागांत थंडी वाढली आहे. ही थंडी रविवार आणि सोमवार कायम राहणार आहे. तर आज शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथे नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यात हवामान कोरडे झाले आहे. यातच उत्तर भारतात होत असलेल्या वातारणातील बदलामुळे राज्यातील थंडीतही चढ-उतार होत आहे. पुढील काही दिवस ही स्थिती अशीच राहणार आहे. त्यामुळे किमान तापमानात चांगलेच बदल होतील. त्याचबरोबर कमाल तापमानातही काही अंशी बदल होतील.

वाचा:  आचारसंहिता लागली! ‘या’ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचं बिगुल वाजलं

राज्यातील नांदेड, मालेगाव, वर्धा, नगापूर, बीड या ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. तर यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर या ठिकाणी सरासरीच्या तुलनेत किमान तापमानाचा पारा तीन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे या भागांत चांगलीच थंडी आहे.

कोकणात आकाश निरभ्र झाल्याने किंचित थंडी कायम आहे. त्यामुळे अलिबाग, मुंबई, रत्नागिरी, डहाणू या भागांत किमान तापमानाचा पारा १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव चांगलाच आहे. किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागांतही बऱ्यापैकी थंडी आहे. यामुळे या भागात १० ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे.

वाचा:  पावसाळ्यातील भरपाईसाठी गावकरी करणार आंदोलन

दरम्यान. मराठवाड्यात थंडी कमी-अधिक स्वरूपाची आहे. त्यामुळे किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. विदर्भातही मागील तीन ते चार दिवसांपासून थंडी कायम आहे. त्यामुळे किमान तापमानाचा अजूनही ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App