राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के; यंदाही मुलींची बाजी

Smiley face < 1 min

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थांची आणि पालकांची उत्सुकता संपली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. तर यंदा राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे.

यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे.

वाचा:  पुन्हा नव्याने दुध आंदोलन उभारले जाणार

विभागनिहाय टक्केवारी
पुणे- 97.34
नागपूर – 93.84
औरंगाबाद – 92.00
मुंबई -96.72

कोल्हापूर – 97.64
अमरावती – 95.14
नाशिक – 93.73
लातूर – 93.09
कोकण – 98.77

यंदाही निकालात मुलींची बाजी
यंदाही निकालात मुलींची बाजी असलेली पाहायला मिळत आहे. यंदा 96.91 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण तर 93.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.01 टक्क्यांनी जास्त आहे.

वाचा:  ऐकावे ते नवलचं...! म्हशीला झालं जुळं

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App