पुणे लॉकडाऊन मध्ये बाजार समितीसह उपबाजार बंद राहणार

Smiley face < 1 min

ई ग्राम : कोरोना विषाणू फैलावामुळे रुग्णांची शहरातील वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जाहिर केलेल्या पुणे आणि पिंपरीं चिंचवडच्या संपूर्ण टाळेबंदीच्या काळात बाजार समितीच्या मुख्य आवारातील सर्व बाजारांसह चारही उपबाजार बंद राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

अडते, कामगार, शेतकरी आणि सर्व घटकांनी याची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली. यामध्ये १३ ते २३ जुलै या कालावधीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड, जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

वाचा:  कोरोनामुळे हरभऱ्याचे दर दबावात

दरम्यान शहरातील व्यापारी महासंघाने संपूर्ण टाळेंबदीला विरोध दर्शविला आहे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळिया यांनी पत्रक काढून पुन्हा लॉकडाउन लागू करू नये, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाला केली आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App