शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तुरीने खुल्या बाजारात ओलांडला हमीभावाचा टप्पा

Smiley face < 1 min

नगर – तुरीची शासनाकडून हमी दराने खरेदी केली जात असली तरी खुल्या बाजारात आता तुरीने हमीभावाचा टप्पा ओलांडला आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला ६ हजार ६५० रुपयाचा प्रती क्विंटल दर मिळाला आहे. सध्या नगरसह जिल्हाभरात सुमारे पाचशे क्विंटलच्या जवळपास तुरीची आवक होत आहे. खुल्या बाजारात दर वाढल्याने हमी केंद्रावरील तूर खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

वाचा:  ... तर संसदेवर ४० लाख ट्रॅक्टरचा मोर्चा; टिकैतांचा इशारा

नगर जिल्ह्यात यंदा ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. काही भागातील नुकसानीचा अपवाद वगळला तर यंदा चांगल्या पावसामुळे तुरीचे बंपर उत्पादन निघाले आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार साडे नऊ क्विंटल हेक्टरी उत्पादन दाखवले जात असले तरी यंदा प्रत्यक्षात हेक्टरी पंधरा क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन निघाले आहे.

तूर बाजारात आल्यानंतर दर्जा चांगला नसल्याचे सांगत कमी दराने खरेदी केली जात असल्याने हमीदराने खरेदी करण्याची मागणी केली. त्यानुसार नगर जिल्ह्यात १२ ठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमधून तूर खरेदी केली जात आहे. मात्र अनेक वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच खुल्या बाजारात तुरीने हमी दराचा टप्पा ओलांडला आहे. एक महिन्यांपूर्वी साधारण पाच हजार रुपये तर पंधरा दिवसांपूर्वी साडेपाच हजारांचा तुरीला दर होता.

वाचा:  नगर जिल्ह्यात ‘एवढ्या’ हेक्टरवर कांदा लागवड

गेल्या आठ दिवसांत त्यात वाढ होऊन सहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तुरीची हमी केंद्रावर सहा हजार रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केली जात असली तरी खुल्या बाजारात ६ हजार ६५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळत आहे.

वाचा:  तीन आठवडे अगोदर नवीन उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’

दरम्यान, खुल्या बाजारात दर वाढल्याने हमी केंद्रावरील तूर खरेदीवर परिणाम होताना दिसत आहे. तुरीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुरीच्या दरवाढीचा मात्र तूर डाळीच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App