देशात ५७० कोरोनाबाधित रूग्ण, महाराष्ट्रात ११२ संख्या

ई ग्राम  : जगभर थैमान घातलेल्या कोरोना देशभर पसरत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात सध्या चिंतेचे वातावरण आहे. देशात सध्या कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. त्याला रोखण्यासाठी देशात पुढील २१ दिवस लॉकडाउन केले आहे. तरी काही नागरिक रस्त्यावर येत आहेत.

राज्यातील महत्त्वाच्या शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील कोरोनाची संख्या ही आता ११२ गेली आहे. आज सांगलीतील इस्लामपूर शहरात एकाच घरातील ५ जणांना कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. त्याची टेस्ट करण्यात आली असून पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. तर इस्लामपूर मध्ये ९ कोरोनाबाधित रूग्ण झाले आहेत.

राज्यातील काल कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आज सकाळी १०७ होता,  तोच आकडा आज ११२ वर पोहोचला आहे. तर पुण्यातील पहिले  कोरोनाबाधित असणारे जोडपे आज बरे झाले आहे. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील  कोरोनाबाधित ३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

Read Previous

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०७ वर

Read Next

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०७ वर