‘देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटात काही तथ्य नाही’

Smiley face < 1 min

ई ग्राम टीम :  राष्ट्रवादीने सत्तेसाठी कधीच भाजपला विचारणा केली नाही. उलट भाजपनेचे सत्तेसाठी विचारा केली होती. यामुळे फडणवीसांनी केलेल्या एका मुलाखतीतील गौप्यस्फोटात काही तथ्य नाही, असा पवारांनी दावा केला आहे. दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार यांनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, “राष्ट्रवादीनं सत्तेसाठी भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही. शिवसेनेला दूर ठेवून सरकार बनवू असं प्रस्ताव भाजपनंच दिला. भाजप नेते म्हणायचे शिवसेनेसोबत सरकार बनवायचे नाही. स्थिर सरकारसाठी साथ द्या म्हणून भाजप नेते येत होते. भाजप नेते पाठिंबा मागण्यासाठी तीन वेळा आले होते.”

वाचा:  ‘या’ जिल्हयात पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात

दरम्यान, पंतप्रधानांकडे माझ्याबद्दल किंवा पक्षाबद्दल चुकीची माहिती जाऊ नये, यासाठी मी दिल्लीत जाऊन पतंप्रधानांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना मी स्पष्ट सांगितले होती की राष्ट्रवादी भाजपबरोबर येणार नाही. शिवसेनेसोबत जाऊ किंवा विरोधी पक्षात बसू. हे सांगालया मी दिल्लीला गेलो होतो.

वाचा:  खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली, नागपूरवरून मुंबईला हलविले

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App