ॲपोकॅलिप्टीक असा कोणताही व्हायरस अस्तित्वात नाही

Smiley face < 1 min

ई ग्राम : पोल्ट्रीमध्ये कोरोना विषाणूपेक्षा भयंकर असा ॲपोकॅलिप्टीक व्हायरस येण्याची शक्यता असून त्यामुळे मानव समुहामध्ये कोरोनापेक्षा जास्त मृत्यु होण्याची शक्यता अमेरिकेतील आहार तज्ज्ञ डॉ. मायकल ग्रेगर यांचा हवाला देऊन एका वृत्तवाहिनेमध्ये बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. परंतू ॲपोकॅलिप्टीक असा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसल्याचे पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यांनी सांगितले.

वाचा:  गोदामाअभावी मका खरेदी बंद; शेतकऱ्यांमध्ये रोष

ॲपोकॅलिप्टीक व्हायरस असे शास्त्रीय नाव असणारा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसून ॲपोकॅलिप्टीक या शब्दाचा अर्थ जगाचा विनाश करणारा असा असून डॉ. मायकल यांनी तो त्या अर्थाने वापरला असावा. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार ॲपोकॅलिप्टीक व्हायरस नावाचा विषाणूंचा आंतरराष्ट्रीय पातळीवार पशुंमधील रोगांचे संनिरिक्षण करणाऱ्या ओआयई संस्थेने नमूद केलेल्या कोबड्यांना बाधित करणाऱ्या विषाणूंच्या यादीमध्ये समावेश नसल्याचे श्री. अनूप कुमार यांनी म्हटले आहे.

वाचा:  मराठा आरक्षण सुनावणीच्या तयारीचा आढावा

डॉ. मायकल ग्रेगर यांच्या लिखित पुस्तकावर आधारित आहे व डॉ. मायकल ग्रेगर हे आहार तज्ज्ञ असून मानवी स्वास्थ तज्ज्ञ नसल्याचे व संबंधित बातमी शास्त्रीयरित्या शहानिशा न करता प्रसिध्द करण्यात आली असल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे. यावरून असे लक्षात येते की, ॲपोकॅलिप्टीक व्हायरस आजमितीस अस्तित्वात नसल्याचे व भविष्यात असा एखादा व्हायरस येवू शकतो अशी कल्पना डॉ. मायकल यांनी मांडल्याचे दिसून येत असल्याचे अनूप कुमार यांनी सांगितले.

वाचा:  आभाळासोबतच भरपाईकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App