ई ग्राम : कांदा हे राज्यातील प्रमुख पिक असून जवळपास १५ हजार कोटी पर्यंत कांदा पिकाची उलाढाल जावू शकते. त्यामुळे कांदा बाजाराच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संस्था असणे गरजेचे आहे असे मत शेती अभ्यासक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले. दीपक चव्हाण यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कांदा बाजाराचा हालहवाल या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना दीपक चव्हाण म्हणाले कांदा बाजारभावात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चढ उतार होत असतो. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत असतो. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी किती उत्पादन करावे, विक्री कधी करावी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी संस्था असणे गरजेचे आहे. असे आवाहन दीपक चव्हाण यांनी केले.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.