… यामुळे अयोध्येतील राम मंदिराचा भूमीपूजन समारंभ पुढे ढकला

Smiley face < 1 min

नवी दिल्ली :  अयोध्येतली राम मंदीर भूमीपूजनाचा (ram mender) कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. सध्या सुरू असणाऱ्या भारत-चीन वादामुळे राम मंदीर समितीने हा निर्णय घेतला आहे.

राम मंदीराचा भूमिपूजन सोहऴा पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलै रोजी करणार होते. हा सोहळा दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्ववारे संपन्न होणार होता. आता अनिश्चित काळासाठी भूमीपूजन लांबणीवर पडले आहे.

भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 जवान मारले गेले आहेत. याचा संताप संपूर्ण देशातून व्यक्त केला जात आहे. यामुळे राम मंदीर समितीने भूमीपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, अनेक दिवसांपासून राम मंदीराचा वाद मिटत नव्हता. मागील काही दिवसांपूर्वी हा वाद मिटला. सुप्रिम कोर्टाने निर्णय देऊन त्या ठिकाणी राम मंदिर उभारण्यास परवानगी दिली आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App