यंदा १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम : सहकार मंत्री

Smiley face < 1 min

ई ग्राम : आगामी ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२० पासून सुरु होणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी दिली.

सन २०२०-२१ या वर्षाच्या ऊस गाळप हंगामाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत राज्यातील साखर कारखाने १५ ऑक्टोबर २०२० पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे अधिक उत्पादन अपेक्षित आहे. जादा ऊस लक्षात घेऊन त्याच्या नियोजनासाठी ऑक्टोबर महिन्यात गाळप हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी २२ नोव्हेंबरला हंगाम सुरु झाला होता, असे पाटील यांनी सांगितले.

वाचा:  तुम्ही या सरकारचे 'हेड मास्टर' आहात की 'रिमोट कंट्रोल'? संजय राऊतांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले...

यावर्षी राज्यभरात ८०० लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षी १४७ कारखाने सुरच होते. यावर्षी या १४७ सह आणखी २० ते २५ कारखाने सुरू व्हावेत असा प्रयत्न आहे. सन २०१९-२० या वर्षात साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची ९५ टक्के रक्कम अदा केल्याचेही सहकार मंत्र्यांनी सांगितले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App