एसटी कर्मचाऱ्यांवर मोलमजुरीची वेळ

Smiley face < 1 min

मुंबई – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून एसटीचे चाक थांबलेले आहे. त्यामुळे महामंडळाला रोज कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळत नसल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

त्यामुळे अनेक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांवर मोलमजुरी करण्याची वेळ आली असून काहींनी इतर व्यवसायाकडे वळण्याचा पर्याय निवडला आहे; तर दिवसेंदिवस तग धरणे कठीण होत असल्याने काहींनी आर्थिक तणावातून आत्महत्येचे पाऊलही उचलले आहे.

वाचा:  तर मग १० वर्षानंतर दूध दरवाढ देणार का? सदाभाऊ खोत यांचा सरकारला सवाल

एसटी सेवेला ब्रेक लागल्याने महामंडळाचे रोज 22 कोटींचे उत्पन्न बुडत आहे. अशात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीसुद्धा एसटीकडे पैसे नसल्याने कर्मचाऱ्यांमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळेच परभणी जिल्ह्यातील पाथरी आगारातील तुकाराम पुंगळे या वाहकाने आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजंदारीचे काम करण्याचा पर्याय निवडला आहे; तर एकनाथ लिंगायत या वाहकाने भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

वाचा:  कमी भांडवलात करा मोत्यांची शेती; अन् कमवा बक्कळ पैसा

सिल्लाड आगारातील वाहकाने पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला आहे; तर सांगलीच्या इस्लामपूर आगारातील मेकॅनिकल विभागातील अमोल माळी यांनी नुकतेच गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर मोलमजुरीची वेळ आली आहे. अमोल यांच्यासारखे अनेक एसटी कर्मचारी सध्या आर्थिक संकटात सापडले असल्याने, मार्च महिन्यापासून उर्वरित वेतनासह जुलै महिन्याचेसुद्धा पूर्ण वेतन देण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे.

वाचा:  कोल्हापुरात पुराचा धोका तुर्तास टळला; पावसाचा जोर ओसरला

वेतन नसल्याने कर्मचारी अत्यंत हवालदिल झाला आहे. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांच्या शिक्षणाचीही चिंता आहे. आम्ही आजच अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आहोत. मुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांनाही निवदने दिली आहेत. तातडीने वेतन होणे आवश्‍यक आहे.- संदीप शिंदे, अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App