तंत्र टोमॅटो लागवडीचे….

Smiley face < 1 min

ई-ग्राम : तंत्र टोमॅटो लागवडीचे….पीकवाढीवर तापमानाचा परिणाम

जास्त तापमान, कमी आर्द्रता आणि कोरडे वारे असतील तर टोमॅटो पिकाची फुलगळ होते. उष्ण तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या हवामानात टोमॅटो गुणवत्ता ही चांगली असते तर रंग देखील आकर्षक येतो.

लागवडीची तयारी

जमीन उभी-आडवी खोलवर नांगरून घ्यावी. चांगली कुळवणी करून घ्यावी. त्या वेळी 25 ते 30 टन प्रति हेक्‍टर चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. जमिनीत असलेल्या गवताच्या काड्या, हरळीच्या काश्‍या, लव्हाळागाठी चांगल्याप्रकारे वेचून जाळून टाकाव्यात. उत्तम प्रतीच्या जमिनीत90 ते 120 सें.मी. अंतरावर आणि हलक्‍या जमिनीत 60 ते 75 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे बांधून घ्यावेत. लागण करते वेळी दोन रोपांतील अंतर 45 ते 60 सें.मी. ठेवावे. शक्‍यतो लागवड 90 ु 30 सें.मी. अंतरावर करावी. साधारणपणे 3.60 ु 3.00 मी आकारमानाचे वाफे तयार करावेत.

रोपांची लागवड : टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे. वाफ्यांमध्ये पाणी असतानाच ओल्यातच रोपांची लागवड करावी. मरगळलेली, इजा झालेली, मुळे कमी असणारी, वाकडे व चपटे खोड असणारी तसेच रोगट रोपे लागवडीसाठी घेऊ नयेत. लागवडीपूर्वी रोपे दहा मि.लि. डायक्‍लोरव्हॉस अधिक दहा ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रति दहा लिटर पाणी या द्रावणात बुडवून घ्यावीत. रोपे लावताना रोपांच्या खोडावर दाब देऊ नये. त्यामुळे नाजूक खोड ताबडतोब पिचते व अशी रोपे नंतर दगावतात. लागवड केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे. लागवडीनंतर दहा दिवसांच्या आत जी रोपे मेली असतील त्या ठिकाणी नवीन रोपांचे नांगे भरून द्या

साभार : किसान न्यूज चॅनेल.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App