हळदीला मिळाली दराची झळाळी; मिळतोय ‘एवढा’ भाव

Smiley face < 1 min

आरेगाव : पुसद तालुक्यात मागील वर्षी ४५० हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आली होती. सध्या हळद काढणीला वेग आला असून, भावात तेजी आल्याने शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न होईल, अशी अपेक्षा आहे.

सिंचनाची सुविधा असलेल्या गावात प्रामुख्याने हळदीची लागवड करण्यात येते. मागील वर्षी हळदीला समाधानकारक बाजारभाव भेटला नव्हता. तसेच पुसद येथे हळदीला बाजारपेठ नसल्याने उत्पादकांना मराठवाड्यातील वसमत, हिंगोली येथे हळद विक्री करिता न्यावी लागते. याचा खर्च वाढत असल्यामुळे व बाजारभाव कमी भेटत असल्याने हळदीचे क्षेत्र वाढत नव्हते.

egram
वाचा:  मिरजगावमध्ये झाला ‘महाडीबीटी’ योजनांचा राज्यातील पहिला मेळावा

मागील वर्षी पाच ते साडेपाच हजार रुपये प्रती क्विंटल असलेला बाजारभाव यंदा हळदीच्या भावात तेजी येऊन भाव दहा ते अकरा हजार रुपये प्रती क्विंटल झाला असून, याचा परिणाम पुढील वर्षी होणाऱ्या लागवडीच्या क्षेत्रावर होऊन लागवड क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी व्यक्त केली.

दरम्यान, तालुक्यात प्रामुख्याने ओलिताच्या क्षेत्रावर बारमाही पीक असलेला ऊस घेतला जात होता. परंतु या पेक्षा अधिक उत्पन्न देणारे हळद पीक शेतकऱ्यांना पर्याय ठरणार आहे.

वाचा:  संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कडक कारवाईची शक्यता
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App