हळद दरात सुधारणा; जाणून घ्या बाजारभाव

Smiley face 2 min

सांगली : देशात हळदीची ४० ते ५० लाख (एक पोते ५० किलोचे) हळद शिल्लक आहे. गेल्या पंधरा दिवसांत हळदीच्या दरात सुमारे २०० ते ३०० रुपयांनी दर वाढले असून, सध्या हळदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत नाही. सध्या हळदीला ६५०० ते ९००० हजार प्रति क्विंटल असा दर असून दर टिकून आहेत. फेब्रुवारी २०२२ पर्यंत अंदाजे ३५ लाख पोत्यांची विक्री होईल, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू असतानाच हळदीच्या विक्री काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडील हळदीची विक्री झाली आहे. मात्र हळदीच्या दरात वाढ होईल, या आशेने शेतकऱ्यांनी हळदीची साठवणूक केली आहे. तसेच व्यापाऱ्यांनी देखील हळदीची साठवणूक केली असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले आहे.

egram
वाचा:  सोयाबीन दरात सुधारणा, आवक मात्र कमीच; जाणून घ्या सविस्तर माहिती

गेल्या महिन्यात हळदीच्या दरात सातत्याने किलोमागे एक ते दोन रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु त्यानंतर दरात घट झाली आहे. वास्तविक पाहता गेल्या पंधरा ते वीस दिवसांत हळदीच्या दरात प्रति क्विंटलला २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे.

देशात हळदीची मागणी असली तरी अजूनही कोरोना विषाणूचे सावट आहे. त्यामुळे उठाव होण्यास अडचणी येत आहेत. देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात हळदीला पोषक असे वातावरण आहे. अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस झाला आहे. त्यामुळे हळदीची वाढही चांगल्या प्रकारे झाली आहे. सांगली बाजार समितीत हळदीची सुमारे १५०० ते २००० क्विंटल आवक होत आहे. आवक कमी असल्याने हळदीचे सौदे एक दिवस आड होत असून, आवकीत वाढ झाली तर दररोज सौदे होतात.

वाचा:  राज्यात मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता

सांगली, कर्नाटकातील हळदीला फटका
सांगली जिल्ह्यात जुलै महिन्यात महापूर आला. त्यामुळे जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या हळद हळद पिकात पाणी साचले होते. परिणामी, सांगली जिल्ह्यात सुमारे २० टक्के हळद पिकाला फटका बसला असून, कर्नाटक राज्यातील गोकाक या भागात देखील पुराचा काही प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे या भागातील १० टक्के हळद पिकाचे नुकसान झाले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

वाचा:  हापूस आंब्याचा हंगाम यंदा धोक्यात, कारण...

“देशात अजूनही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे हळदीच्या दरात फार मोठी मंदी येणार नाही. परंतु येत्या काळात हळदीच्या मागणीत काही प्रमाणात वाढ होईल, त्यामुळे दरात वाढ होईल, अशा अंदाज आहे. सध्या हळदीचे दर टिकून आहेत.”
मनोहर सारडा, हळद व्यापारी, सांगली

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App