पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात गाळपासाठी अडीच लाख हेक्टर ऊस उपलब्ध

Smiley face < 1 min

सोलापूर : जिल्ह्यात यंदाच्या ऊसगाळप हंगामाला लवकरच सुरवात होत आहे. त्यादृष्टीने कारखान्यांकडून तयारी सुरु आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. मागच्यावर्षी १ लाख ५५ हजार ८९८ हेक्टरवर ऊस होता. यंदा मात्र सुमारे दोन लाख ५१ हजार ५६५ हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे गाळप हंगाम यंदा जवळपास सहा महिन्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे.

वाचा:  पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

राज्य शासनाने नुकतीच यंदाच्या हंगामाला १५ ऑक्टोबरपासून सुरवात करण्याची परवानगी दिली आहे. जिल्ह्यात गाळपासाठी यंदा ३० साखर कारखान्यांनी तयारी पूर्ण केली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारखान्यांकडील कृषी विभागाच्या नोंदीनुसार आडसाली ६० हजार ६३७, पूर्वहंगामी ५५ हजार ६६९, सुरू ३५ हजार ४८९ व खोडवा ९९ हजार ९९३ हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे.

egram
वाचा:  “एकरकमी एफआरपी देणे ही शेतकर्‍यांवर मेहरबानी नव्हे, तर आमचे कर्तव्य”

दरम्यान, ऑक्टोबर ते मार्च असा चालणारा हंगाम जिल्ह्यातील उपलब्ध उसाचे क्षेत्र पाहता एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तसे नियोजन साखर कारखान्यांकडून करण्यात आले आहे. काही कारखान्यांनी बॅायलर प्रदीपन सुरु केले आहे.

एफआरपीची थकीत रक्कम वसूल करा’
यंदा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. पण काही कारखान्यांनी अद्यापही गतवर्षीची एफआरपीची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे या कारखान्यांकडून थकीत रकमा वसूल केल्याशिवाय हंगामास परवानगी देऊ नये, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली. यंदाच्या एफआरपीबाबतही तुकड्या तुकड्याने एफआरपी देण्याचा विचार कारखाने करत आहेत. त्यावरही संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या बाबत सरकार काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे आहे.

वाचा:  विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App