कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर उदयनराजे संतापले, म्हणाले…

Smiley face < 1 min

मुंबई – केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही केंद्राच्या या निर्णयावर संतापले असून केंद्राला पत्र पाठवले आहे.

‘केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.

वाचा:  पुणे जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने आधीच शेतकऱ्यांना शेतमाल कमी दरात विकावा लागल्याने नुकसान सोसावे लागले आहे. आता कुठे कांद्याचे दर वाढत असताना कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना यांचा फटका सहन करावा लागणार आहे. तरी केंद्र सरकारने हा कांदा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही उदयनराजेंनी केली आहे.

दरम्यान, आधीच लॉकडाउनच्या संकटातून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असताना अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल आणि त्यांचे फार मोठे नुकसान होईल. याचा सहानुभुतीपूर्वक विचार करून आपण कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदारांना दिलासा द्यावा, असंही ते म्हणाले.  

वाचा:  तेलगंणा सरकारने वाढविले तांदूळ खरेदीचे उद्दिष्ट; ‘इतका’ लाख टन खरेदी करणार

शेतकऱ्यांकडून रास्ता रोको
कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा विरोध करत शेतकऱ्यांनी उमराणे (ता.देवळा) येथे मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. सटाणा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातही शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. तसेच हा निर्णय तुघलकी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केला.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App