‘उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका! लोकं कोरोनाने नव्हे रोजगार गेल्याने मरतील’

Smiley face < 1 min

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपण कोरोनामुळे होणारा मृत्यू दर आटोक्यात आणू, असे म्हटले आहे. त्यावर उद्धवजी तुम्ही खुदा बनू नका,अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे,भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही. ते कोरोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील. त्यामुळे तुम्ही लॉकडाऊन वाढवू नका, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

वाचा:  तुम्हीच सांगा आता कर्ज फेडायचं कसं?; बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत

राज्यातील लॉकडाउन अजूनही पूर्णपणे शिथिल करण्यात आलेला नाही. काही शहरात करोना प्रसार अजूनही थांबलेला नसल्यानं लॉकडाउन लागू केलेला आहे.

त्यामुळे जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनीही नकारात्मक भूमिका मांडली आहे. मुलाखतीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लॉकडाउन न वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

वाचा:  महामहीम राज्यपाल नागरिकांच्या हक्कांप्रति संवेदनशील; रोहित पवारांचा खोचक टोला

बुद्धाने एक सत्य वचन सांगितले आहे की, माणूस जन्माला आला तर त्याला मृत्यू हा निश्चित आहे. त्यामुळे शासनाला विनंती आहे की, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या कामाला लागावे. तरच माणसं जगतील अन्यथा उपासमारीने मरतील. त्यामुळे आता लॉकडाऊन वाढवू नका, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App