युपीएससीची ३१ मे रोजीची पूर्वपरीक्षा रद्द, या तारखेला जाहीर होणार नवी तारीख

Smiley face < 1 min

ई ग्राम : देशातील लॉकडाऊन परिस्थितीमुळे 31 मे रोजी होणारी युपीएससीची पूर्वपरीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाने रद्द केली. यांनतर परिस्थिती पाहून 20 मे नंतर परिक्षेची नवी तारीख जाहीर केली जाईल, असे लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले आहे. लॉकडाऊन मुळे याअगोदर वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ सह इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सध्या देशाच्या अनेक भागात कोरोनाचे संक्रमण अतिशय वेगाने वाढत आहे. त्यामुळे पूर्वपरीक्षा घ्यायची की नाही, याचा निर्णय करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. परीक्षा पुढे ढकलण्याचा सूर बैठकीत उमटल्यानंतर अखेर आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीचा आढावा घेऊन 20 मे नंतर युपीएससीच्या पूर्वपरिक्षेची नवी तारीख निश्चित केली जाणार आहे.

वाचा:  धोकादायक गावांचे होणार सक्तीने पुनर्वसन - उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्र सरकारने अलीकडेच लॉकडाऊनचा कालावधी वाढवत 17 मे पर्यंत लॉकडाऊन राहील, असे स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनची स्थिती पाहता तसेच रेड आणि ऑरेंज विभागात असलेले विविध प्रकारचे निर्बंध लक्षात घेता अशा ठिकाणी परीक्षा घेणे शक्य नसल्याचे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. पूर्वपरिक्षेसाठी पुढील आठवड्यात विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड जारी केले जाणार होते. मात्र ही प्रक्रिया आता स्थगित करण्यात आली आहे.

वाचा:  फुटाने वाढले, इंचाने ओसरू लागले; कोल्हापुरात संथगतीने पाणी कमी

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App