राज्यात चार कोटी बारा लाख नागरिकांचे लसीकरण

Smiley face 2 min

नगर : कोरोना संसर्गाची तिसरी लाट रोखण्यासाठी राज्यात कोरोनाचे लसीकरण करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे राज्य सरकारकडून सांगितले जात असले तरी ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग कमीच आहे. सहा महिन्यापुर्वी लसीकरण सुरु होऊनही आतापर्यत ४ कोटी १२ लाख लोकांना लसीकरण झाले आहे. त्यातही दोन्ही डोस झालेले केवळ ९८ लाख लोक आहे.

शहरी भागात लसीकरणासाठी लोकांच्या चकरा सुरु आहेत. ग्रामीण मध्येही लस उपलब्ध होत नसल्याने लोक त्रस्त आहे. राज्यात आतापर्यत झालेल्या लसीकरणारपैकी मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापुर, नागपुर, नाशिक, नगर या सात जिल्ह्यातच सुमारे २ कोटी २९ लाख ३६ हजार लोकांचे लसीकरण झाले आहे. आदीवासी बहूल जिल्ह्यातही अल्प प्रमाणात लसीकरण झाल्याचे आकडेवारीवरुन दिसतेय. महाराष्ट्रात आतापर्यत पुरुषाचे २ कोटी २३ लाख ६९ हजार तर महिलांचे १ कोटी ८८ लाख ५४ हजार ६६२ लसीकरण झालेय.

egram
वाचा:  महाकाय हत्तींना रोखण्यासाठी सरकार घेणार चिमुकल्या मधमाशांची मदत; जाणून घ्या कारण...

राज्यात कोरोनाची तिसरी लाट सक्रीय होण्याआधीच जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. लस घ्यायला आता लोक तयार झाले असले तरी बहूतांश भागात लस मिळेनासी झाली आहे. शहरी भागात तर लस घेण्यासाठी सकाळी सहा वाजताच लोकांना आरोग्य केंद्रासमोर रांगा लावाव्या लागत आहेत. मुंबईत घरोघरी लसीकरण करण्याची मोहिम सुरु केल्याने लसीकरणाला वेग येईल असा राज्य सरकारचा अंदाज आहे.

ग्रामीण भागापेक्षा शहरीभागात लसीकरणाला अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे आतापर्यतच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. अनेक काही भागात लस उपलब्ध होताना दिसत नाही. आतापर्यत महाराष्ट्रात ४ कोटी १२ लाख लोकांच लसीकरण झाले आहे. दररोज साधारण चार ते साडेचार लाख लोकांचे लसीकरण होत आहे.

वाचा:  बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे झाले...; झुंज दुर्घटनेचा बचावलेल्या श्याम यांनी सांगितला थरार

दरम्यान, आदीवासी बहुल हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातही लसीकरणाचा वेग कमीच आहे. देशातही सर्वाधिक उत्तरप्रदेशात ४ कोटी ४३ त्या पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. तिसरा क्रमांक गुजरातचा लागतो. देशात झालेल्या ४२ कोटी ८५ लाख ५६ हजार १७७ लोकांचे लसीकरण झाले आहे.

राज्याची लसीकरणाची स्थिती
१) पहिला डोस – ३ कोटी १३ लाख ५७ हजार ८८३
२) दुसरा डोस – ९८ लाख ४५ हजार ०४३
३) १८ ते ४४ वर्ष – १ कोटी ४७ लाख ६४ हजार ७१२
४) ४५ ते ६० वर्ष – १ कोटी ४५ लाख ९६ लाख ६२६,
५) ६० वर्षावरील – १ कोटी १८ लाख ४१ हजार ५८८
६) सर्वाधिक लसीकरण – मुंबई (६९,५३,२८०), पुणे (५८,८९,५७७), ठाणे (३२,१६,७४२), नागपुर (२२,४३,५७४), नाशिक (१७,५४,३९४),कोल्हापुर – (१७,०६,७२२) नगर – (११,७१,७३४)
७) सर्वात कमी लसीकरण – हिंगोली (२ लाख ६३ हजार१५१), गडचिरोली (३ लाख १९ हजार ४५०), सिंधुदुर्ग (३ लाख ३३ हजार २४२)

वाचा:  कांदा रोपांच्या दरात घसरण; लागवडीला पावसाअभावी फटका
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App