वीज दरवाढीबाबत विदर्भ राज्य आंदोलन समितीही आक्रमक

Smiley face < 1 min

ई ग्राम : महावितरण कंपनीने घेतलेला वीज दरवाढीच्या प्रस्तावावर राज्य वीज नियामक आयोगाने मंगळवारी शहरात बैठक घेतली. यात ग्राहक आणि  इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी वीज दरवाढ याला विरोध दर्शवला. तसेच सौर ऊर्जेवर प्रस्तावित ग्रिड सपोर्टेड शुल्क आकारणीच्या महावितरणच्या  प्रस्तावालाही व्यावसायिक प्रतिनिधींनी आणि संघटनानी विरोध केला.

विदर्भ राज्य आंदोलन समितीही आक्रमक
राज्यात सर्वाधिक विजेचे उत्पादन विदर्भात होते. त्यानंतरही विजेचा वहन खर्च मुंबईपासून वीज प्रकल्प असलेल्या कोराडीसह इतर भागातील ग्राहकांमध्ये समसमान विभागला जातो. हा वीज उत्पादन करणाऱ्या भागातील ग्राहकांवर अन्याय आहे. येथील नागरिकांना वीज दरात सवलत आवश्यक आहे. वीज कंपन्यांतील हानीलाही आयोगाने विभागनिहाय विभागण्याचे महावितरणला आदेश द्यावे. त्याने विभागानुसार हानी स्पष्ट होईल, असे सांगत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी दरवाढीला विरोध केला.

वाचा:  सोयाबीन न उगवल्याची खंडपीठाकडून दखल; पोलिसांना कारवाईचे आदेश

यावेळी श्रीनिवास खांदेवाले म्हणाले,  विदर्भात सर्वाधिक वीज उत्पादन होत असल्याने येथील नागरिकांना सरकारने रॉयल्टी देण्याची गरज केळकर समितीने आपल्या अहवालात विशद केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. महागडय़ा विजेने येथे उद्योग येत नाहीत. एका ६०० फूट घर असलेल्या  रिक्षाचालकाला सव्वा लाखाचे तर दुसऱ्या एका गरीब नागरिकांला एक लाखाचे देयक पाठवले, असेही त्यांनी याप्रसंगी आयोगाला सांगितले.

वाचा:  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने कर्ज द्यावे; भाजपाची मागणी

सामान्यांना समजेल असा साधा – सोपा प्रस्ताव हवा
महावितरण आयोगाला सादर करत असलेला ५०० पानांचा इंग्रजीतील प्रस्ताव सामान्यांना कळत नाही.  हा सादर करण्यात येत असलेला प्रस्ताव  जाणीवपूर्वक इंग्रजीत केला जातो. दरवाढीच्या प्रक्रियेत  सामान्य ग्राहकांना सहभागी करून घेतले जात नाही. जर तसे केल्यास वीज कंपन्यांतील गोंधळ बाहेर येईल. सौर ऊर्जेबाबत वारंवार वीज कंपनी करत असलेल्या नियमांनी ग्राहकांनाही मन:स्ताप होतो. या प्रकारासाठी महावितरणला मोठय़ा उद्योजकांची फूस असल्याची शक्यता नकारता येत नाही, असे अभिजीत शुक्ला म्हणाले. त्यावर आयोगाने त्यांना नियमावर व प्रस्तावातील आकडय़ावर बोलण्याची तंबी दिली.

वाचा:  गोपीचंद पडळकरांवर अजित पवार संतापले, म्हणाले...

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App