किसान क्रेडीट कार्ड काढायचयं; मग असा करा अर्ज

Smiley face 3 min

टीम ई ग्राम – शेतकऱ्यांना शेतीसंबंधिच्या कामासाठी अर्थ सहाय्य करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने किसान क्रेडीट कार्ड (KCC) ही योजना आणली आहे. कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे अर्थ सहाय्य केले जाते. या योजनेचा लाभ कोणताही शेतकरी घेवू शकतो. यामध्ये स्वत;च्या मालकीची शेत जमीन असणारे, दुसऱ्याची जमीन कसणारे किंवा सामायिक शेती करणारे, असे सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात. याशिवाय पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येवू शकतो.

केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१७ मध्ये एक परिपत्रक काढले. त्यानुसार देशामध्ये ६ कोटी ९५ लाख शेतकरी किसान क्रेडीट कार्डचा वापर करत असल्याचे सरकारने सांगितले. मात्र, एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत या योजनेच्या वापरकर्त्या शेतकऱ्यांची संख्या खुप कमी होती. त्यामुळे फेब्रुवारी २०२० मध्ये केंद्र सरकारने जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थींना किसान क्रेडीट कार्डचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सरकारने मोहिम सुरु केली. या मोहिमेचा भाग म्हणूनच सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटवर किसान क्रेडीट कार्डसाठीचा अर्ज उपलबध्द करून दिला.

किसान क्रेडीट कार्डसाठी अर्ज कसा करायचा –
सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर PM KISAN असे सर्च करायचे आहे. यानंतर वेबसाईट उघडली जाईल. या वेबसाईटवर उजव्या बाजूला farmers corner हा पर्याय दिसेल. त्याच्याखालीच download KCC form हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर केसीसीचा अर्ज दिसेल.

केसीसी अर्ज कसा भरायचा –
या अर्जावर सर्वात वरच्या बाजूला ज्या बँकेत तुमचे खाते आहे, त्या बँकेचे नाव आणि शाखा याची माहिती द्यायची आहे. त्यानंतर त्या शाखेच्या शाखा व्यवस्थापकाचे नाव लिहायचे आहे. यावंतर तुम्हाला केसीसीचा प्रकार आणि तुम्हाला किती कर्ज पाहिजे, याची माहिती द्यायची आहे. त्यानंतर याच्या खालोखाल दोन पर्याय आहेत. एक म्हणजे तुम्हाला नविन केसीसी पाहिजे आहे आणि दुसरा म्हणजे तुमच्याकडे केसीसी आहे परंतू तुम्हाला तुमची कर्ज मर्यादा वाढवून घ्यायची आहे.

वाचा:  भारताच्या कांद्यामुळे बांगलादेशच्या डोळ्यात पाणी; केली 'ही' मागणी

जर तुमच्याकडे केसीसी आहे पण काही कारणामुळे ते बंद आहे, तर हे केसीसी पुन्हा सुरू करण्यासाठी तिसऱ्या पर्यायचा वापर करू शकता. यानंतर तुम्हाला पाहिजे असलेल्या कर्जाची रक्कम तिथे लिहायची आहे. त्यानंतर अर्जदाराला त्याची संपूर्ण माहिती द्यायची आहे. यामध्ये अर्जदाराचे नाव, पीएम किसान निधीचे पैसै ज्या खात्यावर जमा होतात, तो खाते क्रमांक येथे द्यायचा आहे. त्यानंतर खालच्या रखान्यात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना याचा पर्याय आहे. जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही या पर्यायावर क्लिक करू शकता. यानंतर खालच्या भागात तुमच्याकडे आता असलेल्या कर्जाती माहिती द्यायची आहे. यात कर्ज कोणत्या बँकेचे आहे. कर्जाची रक्कम किती शिल्लक आहे. याशिवाय कर्जाची थकबाकी याची माहिती याठिकाणी द्यायची आहे.

अर्जाच्या पुढच्या भागात तुमच्याकडे किती जमिन आहे आणि त्या जमिनीवर कोणते पीक घेता याची माहिती द्यायची आहे. यामध्ये गावाचे नाव, जमिनीचा गट क्रमांक तसेच ही जमिन तुमच्या स्वत;च्या मालकीची आहे, भाडेतत्वावर कसता आहे की सामयीक शेती आहे याबद्दलची माहिती द्यायची आहे. त्यानंतर तुमच्यकडे जमिन किती आणि या जमिनीत कोणकोणती पिके (खरिप, रब्बी) घेता याची माहिती द्यायची आहे. यानंतरचा रखाना हा मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना याठिकाणी माहिती भरायची आहे. यानंतर सगळ्यात शेवटच्या रखान्यात कर्जापोटी तारण काय ठेवायचे, याबद्दलची माहिती द्यायची आहे. यानंतर सगळ्यातखालच्या बाजूला सही करायची आहे. अशा पध्दतीने तुम्ही केसीसीचा अर्ज भरू शकता.

वाचा:  अधिकारी साखर झोपेत तेव्हा अजित पवार फिल्डवर; ६ वाजताच केली मेट्रोच्या कामाची पाहणी

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे –
एकदा का हा अर्ज भरून झाला की, तुम्हाला हा अर्ज घेवून बँकेत जायचे आहे. या अर्जासोबत तुम्हाला जमिनीच्या संदर्भातील कागदपत्रे जोडायची आहेत.
१) सातबारा
२) ८- अ
३) दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्याचे प्रमाणपत्र
४) रहिवाशी प्रमाणत्र
५) ओळखपत्र
६) २ पासपोर्ट आकाराचे फोटो
एकदाकाही कागदपत्रे तुम्ही बँकेत जमा केली की, दोम आठवड्यात बँकेने केसीसी तुमच्या पत्त्यावर पाठवणे अपेक्षित असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

तुम्हाला मिळालेले किसान क्रेडीट कार्ड शेतकऱ्याच्या बँक खात्याला जोडलेले असते. या कार्डची वैधता ही दोन वर्षाची असली तरी प्रत्येक वर्षी नुतनीकरण करणे गरजेचे असते. या व्यतिरिक्त जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी इंडीयन बँक असोसीएशनने कृषी कर्जासाठीचा अर्ज दिला आहे. वर सांगितल्याप्रमाणे हा अर्ज डाऊनलोड करून भरून बँकेत जमा करायचा आहे. या अर्जासोबत वर सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत. हा अर्ज बँकेत भरल्यानंतर दोन आठवड्यात किसान क्रेडीट कार्ड तुम्हाला मिळेल. याशिवाय सामान्य सेवा केंद्र (common service center) किंवा आपले सरकारच्या केंद्रावर जावे लागेल. याठिकाणी तुम्हला केसीसी साठीचा अर्ज ऑनलाईन भरता येईल. मात्र, यासाठी तुम्हाला ठराविक शुल्क आकारले जाईल.

वाचा:  पणन महामंडळाची 'ही' नवी योजना; शेतमाल वाहतूकीसाठी मिळणार अनुदान

केसीसी अंतर्गत मिळणारे कर्ज आणि फायदे –
केसीसी अंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला किता कर्ज द्यायचे हे त्या शेतकऱ्याकडे किती शेती आहे. त्यातून त्याला उत्पन्न किती आहे. याशिवाय त्याच्याकडे लागवडीखालील क्षेत्र किती आहे. यावरून ठरवले जाते. केसीसी अंतर्गत शेतकऱ्याला ३ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. यापैकी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ड हे बिनव्याजी दिले जाते. १ लाख ६० हजारांपर्यांतचे कर्जासाठी कोणतेही तारण ठेवावे लागत नाही. मात्र, ३ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शेतकऱ्याला तारण ठेवणे गरजेचे असते. केसीसी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर ७ टक्के व्याजदर आकारला जातो. परंतू शेतकरी जर एका वर्षातच या कर्जाची परतफेड करणार असेल तर त्याला व्याजदारात ३ टक्क्यांची सुट दिली जाते. म्हणजेच शेतकऱ्याला कर्जासाठी ४ टक्के व्याजदर भरावा लागतो. शेतकऱ्याने शेतमालच्या विक्रीतून या कर्जाची परतफेड करणे अपेक्षित असते. याशिवाय केसीसी अंतर्गत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याला ५० हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. तसेच इतर धोक्यांसाठी २५ हजारांचेही विमा संरक्षण दिले जाते.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App