उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

Smiley face < 1 min

पुणे : राज्यात मॉन्सून सक्रीय होण्यास पोषक हवामान तयार झाले असल्याने ढगांची दाटी झाली आहे. मुंबईसह कोकणात विविध ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. उद्या कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा, विदर्भातही पावसाचा जोर वाढणार असून, काही ठिकाणी मेघगर्जना, वीजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वाचा:  श्रावण सरीने बटाटा पिकाला जीवनदान, पिक फुलोऱ्यात

मंगळवारी सकाळपर्यंत काही ठिकाणी, तर उर्वरीत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात पावसाचा जोर अधिक होता. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकून अमृतसर ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे.

पश्‍चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण महाराष्ट्रपासून केरळपर्यंत सक्रीय आहे. अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे पावसाला सुरवात झाली आहे.

वाचा:  कमी भांडवलात सुरू करा हे ४ फायद्याचे व्यवसाय

उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

दरम्यान, या शिवाय नाशिक, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांसह विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

वाचा:  सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण, ‘या’ राज्यांत मेगाभरती

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App