उजनी धरणातून भिमा नदीत पाणी सोडले

Smiley face < 1 min

ई ग्राम :  उजनी धरणातून मंगळवारी (दि११) रोजी भिमा नदीत १६०० क्युसेक्यने पाणी सोडण्यात आले आहे. सोडण्यात आलेल्या पाण्यात हळूहळू वाढ करण्यात येणार असून तेच पाणी ६ ते ८ हजार क्युसेक्यपर्यत सोडण्यात येणार असल्याचे उजनीचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले.  

पुणे येथे ३० डिसेंबर रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ‘उजनी’तून भीमा नदीत ७ ते १७ फेब्रुवारीदरम्यान पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे  पाणी सोडण्यात आले आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडल्यामुळे भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी २३२ किलोमीटर अंतर कापून औज बंधार्‍यात येते. हे अंतर कापत असताना धरणातून औज बंधार्‍यात दोन टीएमसी पाणीसाठा करण्यासाठी ७ टीएमसी पाणी उजनी धरणातून सोडावे लागते. 

वाचा:  मुंबई आणि कोकणात आजही मुसळधार पाऊस होणार, हवामान खात्याचा इशारा

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उजनी धरण क्षेत्रात येणार पाण्याच्या भागात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे धरण पुर्ण क्षमतेने भरले होते. तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्यासाठी मागणी होत नव्हती. त्यामुळे कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाण्याचे आवर्तन कालावधी पूर्ण होण्याच्या आधी बंद करावे लागले होते.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App