चंद्रपूर जिल्ह्यात पाणीटंचाई; ५२५ गावांसाठी १५ कोटींची मागणी

Smiley face < 1 min

चंद्रपूर : उन्हाची काहिली वाढण्यासोबतच जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी प्रश्‍न गंभीर होण्याची भीती वर्तविली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने २०२०-२१ या वर्षाकरिता कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ५२५ गावांकरिता १५ कोटींच्या निधीची मागणी आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या कमीच पावसाची नोंद झाली. त्यामुळे सिंचन प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. जिल्ह्याची भूजल पातळी देखील खालावत असून, बोअरवेल व विहिरींनी अनेक भागात तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५२५ गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. भूजल सर्व्हेक्षण विभागाने आपल्या अहवालात तसे संकेत दिले आहेत. त्याचाच आधार घेत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

egram

या आराखड्यानुसार भाग दोनमध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान ५२५ गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. त्यावर मात करण्यासाठी ६३८ कामांचे नियोजन करण्यात आले. भाग एक, दोन व तीन साठी १४ कोटी ९६ लाखांच्या निधीची गरज आहे. शासनाकडून किमान पहिल्या भागातील १२ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी तत्काळ मिळाला नाही, तर उपाययोजनांची कामे प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर निधीसाठी पाठपुरावा केला जात आहे.

दरम्यान, एप्रिल, जूनमध्ये प्रशासनाकडून ३० गावांमध्ये ३० टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावीत आहे. याकरिता २ कोटी २२ लाख २५ हजाराची तरतूद आराखड्यात आहे. पाणीटंचाईमुळे सिंदेवाही, गोंडपिपरी हे तालुके सर्वाधीक प्रभावित होणार आहेत.

एकूण गावे – १४२६
संभाव्य टंचाईग्रस्त गावे – १३३३
बोअरवेल दुरुस्ती – ११७
विहिरीतील गाळ काढणे – ५४९
नवीन विंधन विहिरींसह हातपंप – ३४७
पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती – १४७

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App