पंतप्रधान पीक विमा योजना काय आहे? या अंतर्गत कोणत्या पिकांना मदत मिळते? जाणून घ्या

Smiley face < 1 min

टीम ई टीम – दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ असो किंवा गारपीट अशा नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अशावेळी देशभरातील अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) मदत करते. त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना त्यासंदर्भात तशी नोंद करावी लागते. तर नेमकी पंतप्रधान पीक विमा योजना काय आहे. याबद्दल आपण जाणून घेऊ.

योजनेचा उद्देश
ही योजना खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. अधिसूचित पिकांना नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग इत्यादी बाबींपासून विमा संरक्षण देणे आणि नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई देऊन पीक नुकसानीच्या कठीण कालावधीत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य राखणे, हा या योजनेचा उद्देश आहे.

वाचा:  सीएए, एनआरसीबाबब सरसंघचालकांचे मोठं विधान, म्हणाले...

समाविष्ट पिके : (१५ पिके) (खरीप हंगाम)
तृणधान्य : भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका.
• कडधान्य – तूर, मूग, उडीद.
• गळीत धान्य – भुईमूग, सोयाबीन, तीळ, कारळे, सूर्यफूल.
 नगदी पिके : कापूस व कांदा,
• समाविष्ट पिके – (०८ पिके) (रब्बी हंगाम)
तृणधान्य व कडधान्य : उन्हाळी भात, गहू (बागायत जिरायत), रबी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा
• गळीत धान्य : उन्हाळी भुईमूग, करडई, सूर्यफूल, • नगदी पिके : रब्बी कांदा

वाचा:  कोल्हापूरात मुसळधार सुरूच; पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता, NDRF ची टीम रवाना

सहभागी शेतकरी
अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक राहील.

विमा संरक्षण
१) पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट
२) प्रतिकूल हवामानामुळे पिकाची पेरणी/लावणी न झाल्यास होणारे नुकसान
३) पीक कालावधीत प्रतिकूल
४) काढणी पश्चात नुकसान, हवामानामुळे होणारे नुकसान
५) स्थानिक नैसर्गिक आपत्ती (गारपीट, भुस्खलन, पुराचे पाणी शेतात आल्यास)
जोखीम स्तर –  या योजनेअंतर्गत विमा हप्ता व अनुदान ७० टक्के जोखीम स्तर देय आहे.

वाचा:  कोकणात जोरदार पावसाची शक्यता; उत्तर भारतात मान्सूनचा प्रवास मंदावला

विमा हप्ता व अनुदान
शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टके आणि नगदी पिकांसाठी ५ टक्के असा किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जो कमी असेल तो राहील. उर्वरित विमा हप्ता रक्कम ही अनुदान स्वरूपात केंद्र व राज्य शासनामार्फत समप्रमाणात देय राहील.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App