कोरोना संपल्यावर मनमानी करा, खासदार बापटांचा अजित पवारांना टोला

Smiley face < 1 min

ई ग्राम : पुणे शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या बदलीचा विषय आता पेटला आहे. पुण्यातील कोरोना परिस्थिति निर्णायक टप्प्यात पोहोचली असताना पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची अचानक बदली करण्यात आली. या चुकीच्या निर्णयाचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केली.

याबाबत बोलताना खासदार बापट यांनी या निर्णयाचा विरोध करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या विरोधात गरज पडल्यास आंदोलनाचाही इशारा दिला आहे.

वाचा:  भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर; नवाब मलिकांचा दावा

गिरीश बापट म्हणाले, ‘पालिका आयुक्त शेखर गायकवाड हे चांगलं काम करत होते. त्यामुळं या चुकीच्या निर्णयाचा मी निषेध करतो. तर आपल्या हातात सत्ता असून कोरोना संपल्यानंतर आपण मनमानी कारभार करु शकता, असा टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता लगावला.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App