राज्यात लॉकडाऊन होणार?, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीने बैठक

Smiley face < 1 min

मुंबई :  राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्याच्या बहुतांश भागात संचारबंदी आणि लॉकडाऊन लागू केला आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. आज दुपारी ३ वाजता ही बैठक होणार असून सर्व मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित असतील अशी माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ एप्रिलला साधलेल्या संवादा वेळी येत्या दोन दिवसांत लॉकडाऊन बाबतचा निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं होतं. यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

egram

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे ही मिटिंग होणार आहे. आज रविवार असूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याने त्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये आजही मार्केट आणि रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढत असल्याने सरकारकडून कठोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईमध्ये देखील झपाट्याने रूग्णसंख्या वाढत आहेत. आज सकाळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच नागरिकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यात लॉकडाऊन बाबतचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा आहे. लॉकडाऊन करायचा का नाही, हे ते ठरवतील, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाताना म्हटलं आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App