सरकारला शहाणपण सुचले पण उशिरा : देवेंद्र फडणवीस

Smiley face < 1 min

नागपूर : महाविकास आघाडीच्या विरोधात सर्वत्र असंतोष निर्माण झाल्यानंतर ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारने अध्यादेश काढला. हे आधीच केले असते तर आरक्षण गेलेच नसते, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पत्रकारांसोबत बोलत होते. अध्यादेश म्हणजे शहाणपण सुचले पण उशिरा, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

अध्यादेश काढण्याचा निर्णय योग्य आहे. मात्र, सध्या जाहीर झालेल्या पोटनिवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत. पोटनिवडणूक जाहीर झालेल्या संबंधित पाच जिल्ह्यांमध्ये ओबीसींसाठी एकही जागा आरक्षित राहणार नाही.

egram
वाचा:  “एकरकमी एफआरपी देणे ही शेतकर्‍यांवर मेहरबानी नव्हे, तर आमचे कर्तव्य”

राज्य सरकारने अध्यादेश काढला असला तरी राज्य मागासवर्गीय आयोगाकडून इम्पेरिकल डाटा तयार करण्यात आला नाही. त्यानंतरच खऱ्या अर्थाने ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम स्वरूपी टिकू शकेल. अन्यथा अध्यादेशाला कोणी न्यायालयात आव्हान दिले तर पुन्हा आरक्षण गमवावे लागू शकते, असा धोक्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला.

वाचा:  कोल्हापुरातील ऊस हंगाम ‘या’ तारखेनंतर पूर्ण क्षमतेने सुरू होणार

दरम्यान, भविष्यात कशा प्रकारे आरक्षण टिकवता येईल याचा विचार केला पाहिजे. हा प्रश्न नेहमीसाठी सोडवायचे असेल तर राज्य मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल घेऊन सर्वोच्च न्यायालयाची ट्रिपल टेस्टची अट पूर्ण केली पाहिजे, असेही फडणवीस यांनी सांगितले. राहुल गांधी कपोलकल्पित आरोप करतात. आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही. तुम्हीही त्यांना गांभीर्याने घेत जाऊ नका, असेही फडणवीस ते म्हणाले.

वाचा:  विदर्भातील पाच जिल्ह्यांत ‘इतक्या’ हेक्‍टरने रब्बी क्षेत्र वाढणार
egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App