तुमचं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार; सरकार कृषी विभागातील ‘एवढ्या’ रिक्त जागा भरणार

Smiley face < 1 min

सांगली – जिल्ह्यातील कृषी विभागात तब्बल २६६ जागा रिक्त आहेत. अनेक योजना असल्याने कर्मचाऱ्यांअभावी अंमलबजावणीवर परिणाम होत आहे. रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तत्पुर्वी पदोन्नतीचे विषय मार्गी लावण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले आहेत.

मुंबईत कृषी विभागातील रिक्त जागांसंदर्भात राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे, कृषी सहसंचालक आस्थापना कृषी आयुक्तालयाचे (पुणे) सुधीर ननवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, खासगी सचिव संपत डावखर, उपसचिव आस्थापना सुग्रीव धपाटे उपस्थित होते.

वाचा:  यांत्रिकीकरण योजनेसाठी कागदपत्रे जमा करावीत

शासनाच्या कृषी विभागाकडून केंद्र, राज्य विविध योजना राबवल्या जातात. जिल्हा परिषदेकडील अनेक योजनांही कृषी विभागाकडे कडे वर्ग करण्यात आल्यात. योजना जादा आणि कर्मचारी कमी, अशी स्थिती आहे. खते, बियाणे, कीटकनाशकांचे परवाने दिले जातात. कर्मचाऱ्यांअभावी कामे वेळेत होत नाहीत.

जिल्ह्यात ७८६ पदे मंजूर आहेत. ५२० कर्मचारी कार्यरत आहेत. तब्बल २६६ पदे रिक्त आहेत. त्याची गंभीर दखल डॉ. कदम यांनी घेतली. शासनाने भरती प्रक्रिया राबविण्यावर काही निर्बंध लादले आहेत. परंतु रिक्त जागा तत्काळ कशा पद्धतीने भरता येतील. त्यासाठी सकारात्मक प्रयत्न केला जाणार असल्याचे डॉ. कदम यांनी स्पष्ट केले.

वाचा:  थंडीचा प्रभाव काहीसा कमी; जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज

दरम्यान, नागपूर, अमरावतीमधील रिक्त जागा भरल्यानंतर पुणे विभागातील जागा भरता येणार आहेत. तत्काळ मार्ग काढण्यासाठी तांत्रिक पदे भरता येतील. त्यात असलेल्या त्रुटी दूर करण्यात येतील, असेही कदम यांनी म्हटले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App